Inspirational Story on Mother and Son in Marathi
एका खेडे गावामध्ये एक आई आणि तिचा १०- वर्षाचा मुलगा राहत, उद्या आपला मुलगा जत्रेला जाणार त्याच्या हातात १० रुपये
तरी असावे, पण घरात १० रुपये नाही म्हणून त्या माऊलीने
बाजूच्या शेतात राबायला गेली संध्याकाळी मजुरी करून पैसे आणले, तितक्यात मुलगा शाळेतून आला आणि आई ला म्हणाला मला जेवायला दे मी लवकर झोपतो. उद्या जत्रेला जायचे आहे सकाळी लवकर उठेन. मुलगा सकाळी लवकर उठला त्या माऊलीला पण उठवले, मुलगा अंघोळीला जाताना आईला म्हणाला आई लवकर
न्याहारी तयार ठेव मी लगेच अंघोळ करून घेतो माऊलीने भाकर करून ठेवली, दुध चुलीवर होते, मुलगा अंघोळ करून आला आई जवळ बसला आणि आई ला म्हणाला मला
लवकर दुध आणि भाकरी दे मला
उशीर होतोय.....आई ने आजू बाजूला पहिले दुध उतरवायला काहीच सापडत
नव्हते पुन्हा मुलाचा आवाज आला आई लवकर कर ग... माउलीने विचार न करता
तसाच दुधाचा टोप हाताने उतरवला. गरम दुधाच्या टोपाचे चटके मस्तकाला वेदना देऊ
लागल्या. हाताची लाही लाही झाली, पुन्हा मुलाचा आवाज आला.आई लवकर कर ना उशीर होतोय. त्या माउलीने पुन्हा टोप
उचलून दुध प्यालात ओतले
आणि मुलाला दिले, त्या माऊलीच्या
डोळ्यातले अश्रू पाहून त्या मुलाने मान खाली घालून न्याहरी केली. आई ने जवळचे १० रुपये
त्या मुलाला दिले, मुलगा जत्रेत
गेला..संध्याकाळी परतला आई ने विचारले बाळा जत्रेत काय काय पहिले ? मुलाने जत्रेतल्या गमती जमाती सांगितल्या ,
मग आईने विचारले दिलेल्या १० रुपयाचे काय केले काही खाल्लेस कि नाही, त्या मुलाने आई
ला सांगितले की तू डोळे बंद कर मी काहीतरी आणले आहे..तुज्यासाठी माऊलीने डोळे
बंद केले.मुलाने खिश्यातून 'सांडशी' काढून आईच्या हातात दिली, आई च्या डोळ्यात त्या सांडशीच्या स्पर्शाने
अश्रू आले... आई धन्य झाली ...आईच्या हाताला झालेली इजा मुलाच्या मनाला स्पर्श करून गेली ."
"दोस्तानो ,आई च्या पायाशी स्वर्ग आहे.डोंगरा आड गेलेला सूर्य पुन्हा,दिसतो पण मातीआड गेलेली आई पुन्हा दिसत नाही."