Vishvas Nangare Patil Thoughts in Marathi

Vishvas Nangare Patil Thoughts in Marathi

 • आयुष्यातले काही कळत नाही, कधी कधी दिवाही शांत जळत नाही. सावली देणारेच करतात करार उन्हाशी . पाझरणारे डोळेच खेळतात जीवाशी. सोबत असणारेच तसेच दूर असतात. पावूलवाटाच गुरफटून टाकतात. वाऱ्यांशी तक्रार पानांना करता येत नसते. नियतीचे गणित कधी मांडता येत नसते. आयुष्यात तसे नसते काही बेतलेले. आयुष्य एक उत्तर प्रश्न ठावूक नसलेले.
 • शांततेच्या काळात जास्त घाम गाळला 
          तर.....युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते.
 • प्रत्येक कोळ्याला माहित असते कि समुद्र हा भीषण 
           आणि वादळे भयानक असतात पण या कारणांमुळे तो बंदरावर थांबत नाही.
 • स्वत:ची तुलना इतरां बरोबर करू नका.
          तसे केल्यास तुम्ही स्वत:चा अपमान करता आहात.
 • सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
 • नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,
          तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.
 • ज्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजन असते;
          तो कुठल्याही काळोखातून सहज मार्ग काढतो.
 • मी अपयशी झालो नाही तर मी असे १०,००० मार्ग शोधले कि जे काम करत नाही.
 • अशक्य ते शक्य करण्यात वेगळीच मजा आहे;
 • निसर्गातील प्रत्येक वस्तूमध्ये काहीतरी आश्चर्यकारक आहे.
 • आपल्याला केवळ एकाच संधीची गरज आहे.
 • एखादे खोटे वारंवार सांगितले तर ते खरे वाटायला लागते.
 • एखांदी गोष्ट जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ती अशक्य वाटते.
 • मन तयार असेल तर संधी त्यासाठी अनुकूल ठरते.
 

Most Reading