Vishwas Nangare Patil Poem in Marathi

Vishwas Nangare Patil Poem in Marathi

 निर्णय चुकतात
आयुष्यातले आणि
आयुष्य चुकत जाते...

प्रश्न कधी कधी
कळत नाहीत आणि
उत्तर चुकत जाते..

सोडवताना वाटतं
सुटत गेला गुंता...
पण.....

प्रत्येक वेळी
नवनवीन गाठ
बनत जाते
दाखविणाऱ्याला
वाट माहित नसते.....

चालणाऱ्याचे ध्येय
मात्र हरवून जाते..

दिसतात तितक्या
सोप्या नसतात
काही गोष्टी......

"अनुभव"
म्हणजे काय हे
तेव्हाच कळते...

असे मित्र बनवा
जे कधीच
साथ सोडणार नाही..

असे प्रेम करा
ज्यात स्वार्थ असणार नाही..

असे हृद्य बनवा
कि ज्याला
तडा जाणार नाही..

असे हास्य बनवा
ज्यात
रहस्य असणार नाही..

असा स्पर्श करा
ज्याने
जखम होणार नाही..

असे नाते बनवा
ज्याला
कधीच मरण नाही..

Inspirational Poems of Nangare Patil

विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती,
म्हणून मला भीती नाही पराजयाची,
जन्मासाठी कधीच अडून बसलो नव्हतो,
म्हणून मला भीती नव्हती पराजयाची
आयुष्य खूप छान आहे, थोडेसे लहान आहे !
रडतोस काय वेड्या.? लढण्यात शान आहे.!!
काट्यातही फुलांची झुलती कमान आहे !
उचलून घे हवे ते, दुनिया दुकान आहे !
जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे !
"सुखासाठी कधी हसावं, तर कधी रडावं लागतं,
कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावंच लागतं"...

 

घर बैठे ऑनलाइन पैसे कमाने के 25 आसान तरीके

घर बैठे ऑनलाइन पैसे कमाने के 25 आसान तरीके
घर बैठे ऑनलाइन पैसे कमाने के 25 आसान तरीके

Most Reading